Mumbai : मेट्रो 3 विरोधात आता गिरगांववासियानी कसली कंबर

आरे कार शेडचा मुद्दा ज्वलंत असताना त्यात अजून एका आंदोलनाची भर पडली आहे
मेट्रो 3
मेट्रो 3sakal

मुंबई : मुंबईत मेट्रो 3 साठी तयार करण्यात येणाऱ्या आरे कार शेडचा मुद्दा ज्वलंत असताना त्यात अजून एका आंदोलनाची भर पडली आहे. जवळजवळ 7 वर्षांनी पुन्हा एकदा भुयारी मेट्रो 3 या मुंबईत होणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला काळबादेवी गिरगाववासीयांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी 18 ऑक्टोबर रोजी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील नेत्यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव मधील स्थानिकांनी काळबादेवी-गिरगाव पट्ट्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात घेतलेल्या काही निर्णयांच्या विरोधात निषेध रॅली काढली.

शिवसेनेचे स्थानिक नेते पांडुरंग सकपाळ यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यापूर्वी असेच आंदोलन 2015साली प्रकल्पाची सुरुवात झाली तेव्हा करण्यात आले होते. परंतु तत्कालीन शासनाने स्थानिकांचा रोष वाटाघाटी शमवत प्रकल्प सुरू केला होता.

मुंबईत होणाऱ्या मेट्रो 3 मध्ये गिरगाव येथील अनेक जुन्या इमारती बाधित होणार आहेत. या रहिवाशांच्या पुनर्वसनाची आणि त्यांच्या इमारतीच्या पुनर्विकासाची जबाबदारी एमएमआरसीवर आहे. मात्र एमएमआरसीकडून पुनर्वसनाबाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गिरगावमधील रहिवाशांचा आहे. त्यामुळे संतप्त रहिवासी, आम्ही गिरगाव ग्रुप तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी आंदोलन केले. यावेळी एमएमआरसीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. एमएमआरसीने प्रकल्पाबाधितांचे प्रश्न न सोडवल्यास येत्या काळात गिरगावमधील मेट्रो ३ चे काम बंद करू असा इशारा यावेळी देण्यात आला.

"काळबादेवी व गिरगाव रहिवाशांनी एमएमआरसी समोर उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांची योग्य दखल कॉर्पोरेशनद्वारे घेण्यात आली असून त्यांना त्यासंदर्भात त्यांना कळविण्यात देखील आले आहे. कॉर्पोरेशनला काळबादेवी व गिरगाव प्रकल्पग्रातांकडून अद्याप कुठलीही नवी तक्रार अथवा निवेदन प्राप्त झालेले नाही मात्र त्यांच्या कडून कुठलाही नवीन मुद्दा उपस्थित केला गेल्यास त्याची योग्य दखल घेण्यात येईल व प्रकल्पग्रस्तांना त्याविषयी कळविण्यात येईल", प्रवक्ता एमएमआरसी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com