मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला कोरोनाची 'बाधा'

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला कोरोनाची 'बाधा'
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला कोरोनाची 'बाधा'

रायगड : लॉकडाऊनमुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मुदत पुन्हा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 70 टक्के काम झाल्याचा दावा करत डिसेंबरपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करणार असल्याचा विश्वास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व्यक्त केला होता. परंतु लॉकडाऊनमुळे सध्या या कामाला ब्रेक लागल्याने ते काम नियोजित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता मावळली आहे.

सध्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यात पेण, रामवाडी, सुकेळीखिंड, नागोठणे,  कोलाड येथे काही प्रमाणात काम सुरु आहे. माणगाव तालुक्यात जमीन संपादनाचा महत्वाचा अडथळा कायम आहे. त्याचबरोबर काही महत्वाच्या पुलांचेही काम शिल्लक आहे. मुंबई-गोवा महामार्गाशी कोकणातील चाकमान्यांचा भावनिक संबध आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. यासाठी आतापर्यंत वेगवेगळ्या डेडलाईन देण्यात आल्या होत्या. परंतु त्या पाळता आल्या नाहीत. आता बहुतांश काम पुर्ण होत आलेले असताना कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हे काम थंडावले आहे.

कामगारांअभावी कामाचा वेग मंदावला
सध्या महामार्गावरील वाहतूक कमी असल्याने वेगाने काम करणे शक्य होते. तसेच विशेषबाब म्हणून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी महामार्गाचे काम सुरु करण्याचे आदेशही दिले असले, तरी कामगारांअभावी कामाला अद्याप वेग आलेला नाही. त्यामुळे डिसेंबरपर्यंतची डेडलाईन पाळणे शक्य नसल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचेच म्हणणे आहे.

पावसाळ्यातील कामात खंड पडू नये, म्हणून खोदाईची कामे सुरु आहेत. कुंडलिका नदीवरील पूल देखील पाडण्यात आला आहे. काही महत्वाचे पॅचेसमध्ये काम राहिलेले आहे, ते पावसाळ्यापूर्वी करण्याचा प्रयत्न आहे. हे काम लॉकडाऊनमुळे मंदावले आहे.
- सुरेश फेगडे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

सुकेळी खिंडीतील काम वन विभागामुळे बंद होते. त्याला परवानगी मिळाली आहे. माणगाव तालुक्यात भूसंपादनाची समस्या आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून ही समस्या दूर केली जात आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष कामात व्यत्यय आलेला आहे.
- सुनिल तटकरे, खासदार, रायगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com