

Mumbai Goa national highway Accident of private bus
ESakal
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगावनजीक सोमवारी (ता. २४) पहाटे पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुण्याहून खेडच्या दिशेने येणारी खासगी बस महामार्गावरील पुलाच्या अलीकडे असलेल्या बेरिकेडला धडकून ४५ ते ५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात २२ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यातील १० प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.