दिलासादायक! मुंबईत आज रुग्णांचा आकडा हजाराच्या खाली; आज 'इतके' नवे रुग्ण..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

मुंबईत बऱ्याच कालावधी नंतर बाधित रुग्णांची संख्या 1 हजाराच्या खाली आली असून आज 903 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे  एकूण रुग्णसंख्या 77,197 झाली आहे. तर 93 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतांचा आकडा 4554 वर पोचला आहे.

मुंबई : मुंबईत बऱ्याच कालावधी नंतर बाधित रुग्णांची संख्या 1 हजाराच्या खाली आली असून आज 903 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे  एकूण रुग्णसंख्या 77,197 झाली आहे. तर 93 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतांचा आकडा 4554 वर पोचला आहे.

मृतांपैकी 36 रुग्णांचा मृत्यू 48 तासात झाला असून 57 मृत्यू अगोदरच आहेत. मात्र मुंबईत आज एका दिवसात 625 रुग्ण बरे होऊन घरी गेले.                

हेही वाचा: बापरे! कोरोनाच्या औषधाबाबत मुंबईत घडला धक्कादायक प्रकार; तब्बल ५ दिवस..                                                     

मुंबईत आज नोंद झालेल्या 93 मृत्यूंपैकी 67 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 57 पुरुष तर 36 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी11 जणांचे वय 40 च्या खाली होतेे. तर 44 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 38 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                           

संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 818 नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत 53,553 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 625 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  44,170 रुग्णांना घरी सोडण्यात आले.                                                                 

मुंबईत आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 57 टक्के इतका आहे. तर 29 जून पर्यंत एकूूूण 3,28,621 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 18 जून ते 24 जून दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 1.69 इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी हा 41 दिवसांवर गेला आहे.         

हेही वाचा: अरे वाह! पालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉक्टरांना पुन्हा 'ताज' चे जेवण; 1 जुलैपासून होणार सुरुवात 

मुंबईत 750 सक्रिय कंटेन्मेंट झोन असून आतापर्यंत 5875 इमारती सीलबंद करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 7576 अति जोखमीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून सीसीसी 1 मध्ये 14,175 अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. तर संस्थेमध्ये 1,12,874 लोकांचे अलगीकरण करण्यात आले आहे.
mumbai has noticed less than thousand corona patients today 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai has noticed less than thousand corona patients today