बापरे! कोरोनाच्या औषधाबाबत मुंबईत घडला धक्कादायक प्रकार; तब्बल ५ दिवस..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

मुंबईत आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल ७५ हजारांच्या पार पोहोचला आहे

मुंबई: मुंबईत आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल ७५ हजारांच्या पार पोहोचला आहे. वैज्ञानिक कोरोनावर लस तयार व्हावी म्हणून दिवस रात्र मेहनत करत आहेत. मात्र मुंबईत कोरोनाच्या औषधाबाबतीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 

हेही वाचा: वीजबिल जास्त येण्यामागची 'ही' आहेत कारणं, 'म्हणून' बसलाय तुम्हाला वीजबिलाचा शॉक

कोरोनावर औषध असलेल्या रेमडीसीवीर आणि फॅवीपिरावीर यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल गेली पाच दिवस मुंबईच्या एअर कार्गोत अडकून पडला  असल्याची माहिती मिळतेय. एका खासगी वृत्तवाहिनीनं याबाबत वृत्त प्रसारित केलं आहे. मायलन या फार्मास्युटिकल्स कंपनीकडून आयात करण्यात आलेला माल मुंबईतच अडकून पडला आहे. 

राज्य सरकारने ही दोन्ही औषधं कोव्हिडवरील उपचारासाठी मागवून घेऊ असं म्हटलं होतं. भारतात हेट्रो ड्रग्ज आणि सिप्ला या दोन कंपन्यांना रेमडेसीवीर तयार करण्याची आणि विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल गेल्या ५ दिवसांपासून मुंबईच्या एअर कार्गोत अडकून पडल्याने आता हे औषधं कधी तयार होतात यावर संभ्रम निर्माण झाला आहे. 

हेही वाचा: कोरोनाची भीती दाखवून रुग्णांची लूट; कल्याण पूर्वेतील धक्कादायक प्रकार...

राज्यात तब्बल एक लाखांच्यावर कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. दिवसेंदिवस मृतांची संख्याही वाढत चालली आहे. रुग्णांना लवकरात लवकर औषधं पुरवली जातील असं सरकारनं सांगितलं होतं. मात्र तब्बल ५ दिवस हा कच्चा माल मुंबईतच पडून असल्याची माहिती आता समोर येतेय. त्यामुळे  ही औषधं तयार होण्यात विलंब होण्याची शक्यता आहे.  

raw material of corona medicine is in mumbai from last 5 days 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raw material of corona medicine is in mumbai from last 5 days