केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मुंबईच्या वाट्याला अवघी दोनच मंत्रीपदे

शपथविधी सोहळ्यात पियुष गोयल आणि रामदास आठवले या दोघांनाच संधी मिळाली
Mumbai has only two ministerial posts in Modi government cabinet oath taking ceremony
Mumbai has only two ministerial posts in Modi government cabinet oath taking ceremonySakal

- बापू सुळे

Mumbai News : केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील तब्बल सहा चेहऱ्यांना संधी मिळाली असली तरी मुंबईच्या वाट्याला केवळ दोनच मंत्रीपदे आली आहे. २०१९ मध्ये मोदी सरकारमध्ये तत्कालीन शिवसेनेचे अरविंद सांवत यांच्यासह मुंबईतून तिन लोकांना प्रतिनिधित्व मिळाले होते.

आज (ता.९) झालेल्या शपथविधी सोहळ्यात पियुष गोयल आणि रामदास आठवले या दोघांनाच संधी मिळाली आहे. त्यामुळे राजकीय साठमारीत गेलेले तिसरे मंत्रीपद मुंबईला भविष्यात तरी मिळणार का असा अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महत्व अर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मोठे आहे. त्यामुळे २०१९ मध्ये मुंबईतून पियुष गोयल, शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि रामदास आठवले असे तीन मंत्री मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात होते.

मात्र २०१९ च्या निवडणूकीत मुंबईतील सहा पैकी सहा जागा तत्कालीन महायुतीला मिळाले होते.त्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजप नेतृत्वात मतभेद होऊन अरविंद सांवत यांनी मंत्रीपद सोडले होते. मात्र यावेळी लोकसभा निवडणूकांमध्ये मुंबईत महायुतीला मोठा फटका बसला आहे. भाजपने लढवलेल्या तिन जागांपैकी केवळ एकच उमेदवार निवडूण आला आहे.

तर शिवसेना शिंदेचे रविंद्र वायकर हे फेरमतमोजणीक काठावर पास झाले आहे.त्यामुळे मुंबईतील पक्षाची झालेली वाताहत जाग्यावर आणण्यासाठी मुंबईला अधिक प्रतिनिधीत्व देण्याची गरज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत होती.

उत्तर मुंबईची जागा साडेतीन लाखाहून अधिक मताधिक्याने जिंकलेल्या पियूष गोयल यांना मंत्रिंडळात स्थान मिळाले आहे. मंत्री म्हणून गोयल यांची कामगीरी तसेच पंतप्रधानांचा त्यांनी कमावलेला विश्वास यामुळे गोयल यांना संधी जवळपास निश्चित होती.

दुसरीकडे रामदास आठवले यांना पुन्हा राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे. मात्र पियूष गोयल हे भाजपाच्या थिंक टँकचा भाग आहेत, ते राष्ट्रीय पातळीवर जास्त कार्यरत असतात. त्यामुळे त्यांना मुंबईत पक्ष संघटनेत काम करायला वेळ मिळेल का याबद्दल सांशकता व्यक्त केली जाते.

१५ जागांवरची पिछेहाट कशी रोखणार

लोकसभा निवडणूकीत मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. त्यापैकी २० जागांवर महाविकास आघाडी समोर आहे. मलबार हिल, मुलूंड, विलेपार्ले, घाटकोपर (पुर्व), कांदिवली, बोरीवली, मागाठणे, दहिसर, चारकोप या सारखे पक्षाचे पारंपारीक गड महायुतीने मोठ्या मताधिक्याने राखल्या आहे.

तर अनेक विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी किरकोळ आघाडी घेतली आहे. महायुतीच्या १५-१७ जागा धोक्यात असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणूका चार महिन्यांवर आल्या आहेत, त्यामुळे लोकसभा निवडणूकीत झालेली पिछेहाट केवळ दोन मंत्रीपदे देऊन रोखता येईल का हा प्रश्न आहे.

दलित मतांच्या बेगमीसाठी आठवले

मुंबईसह महाराष्ट्रात महायुतीपासून दलित मते दुरावली आहेत. वंचित आघाडीलाही नाकारत दलित समाजाने महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे निकालाच्या विश्लेषणावरुन स्पष्ट दिसत आहे.

राज्यातील अनूसुचित जातीसाठी राखीव असलेल्या ५ पैकी पाच जागांवर आघाडीने मुसंडी मारली आहे. त्यामुळे नाराजी कमी कऱण्यासाठी रामदास आठवलेंना मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा संधी दिली आहे. मात्र यावेळी स्वतंत्र प्रभार तरी मिळेल अशी आशा आठवले यांना आहे.

मुंबईचे किती महत्व आहे, याचा विचार न करता आपले किती खासदार निवडून आले आहेत त्याच प्रमाणात मंत्रीपदे दिल्याचे दिसत आहे. मुंबईला २०१९ एवढीही मंत्रीपदे मिळालेले नाहीत.

- जयंत माईनकर, ज्येष्ठ पत्रकार

सध्याच्या सरकारमध्ये अनेक घटक पक्ष असल्याने प्रत्येकाला सत्तेचा वाटा द्यायचा असल्याने मुंबईला दोनच मंत्री आले आहे. मुंबईतून त्याचे खासदारही दोनच निवडून आल्याने दोनच मंत्री दिले असावेत.

- प्रताप आसबे, राजकीय विश्लेषक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com