
Mumbai Rain
ESakal
मुंबई : मुंबईत यंदाच्या मोसमात पावसाने सरासरीचा उच्चांक ओलांडला आहे. महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २८ ते २९ सप्टेंबर २०२५ दरम्यान शहरात सरासरी ७५ ते ११० मिमी पाऊस नोंदवला गेला, तर हंगामातील एकूण पावसाची वार्षिक सरासरीच्या तुलनेत १० ते ३० टक्क्यांनी अधिकची नोंद झाली आहे. वातावरण बदल, अरबी समुद्रातील वादळे यासह इतर कारणांमुळे पावसाचे प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.