ED Inquiry : हसन मुश्रीफ यांची ईडीकडून चौकशी; सीए महेश गुरव ईडीच्या रडारवर

हसन मुश्रीफ यांचे चार्टर्ड अकाऊंटंट महेश गुरव यांचीही शुक्रवारी ईडीकडून चौकशी करण्यात आली.
ED
EDesakal
Updated on
Summary

हसन मुश्रीफ यांचे चार्टर्ड अकाऊंटंट महेश गुरव यांचीही शुक्रवारी ईडीकडून चौकशी करण्यात आली.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणी शुक्रवारी ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यासोबतच हसन मुश्रीफ यांचे चार्टर्ड अकाऊंटंट महेश गुरव यांचीही शुक्रवारी ईडीकडून चौकशी करण्यात आली. या वेळी मुश्रीफ आणि गुरव याना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. गुरव शुक्रवारी सकाळी ईडी कार्यालयात पोहोचले. महेश गुरव यांना चौकशीनंतर जाऊ देण्यात आलं. महेश गुरव यांना अटकेपासून कोणतंही संरक्षण नाही. गुरव यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती त्यावर सुनावणी सुरू आहे.

कोल्हापूरमधील कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे. ईडीने मुश्रीफांच्या घर, कार्यालयावर छापे टाकले होते. त्यानंतर ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चाैकशीला हजर राहाण्यासाठी त्यांना समन्स बजावले होते. मुश्रीफांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली.

ED
Tuberculosis : मुंबईला आता क्षयरोगाचे भय; वर्षभरातील रुग्णसंख्या ५६ हजार, २५६३ मृत्यू

न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर मुश्रीफ हे दोनवेळा ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले आहेत. मुश्रीफांना पुन्हा चाैकशीला बोलावण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कोल्हापूरमधील कार्यकर्ते, शेतकरी सहभागी होणार होते. पण त्यांना वेळीच पोलिसांनी ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com