मुंबईला आता क्षयरोगाचे भय; वर्षभरातील रुग्णसंख्या ५६ हजार, २५६३ मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tuberculosis patients

गेल्या वर्षभरात क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या ५६ हजारावर झाली तर या रोगाने २५६३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनापाठोपाठ मुंबईत आता क्षयरोगाचे भय निर्माण झाले आहे.

Tuberculosis : मुंबईला आता क्षयरोगाचे भय; वर्षभरातील रुग्णसंख्या ५६ हजार, २५६३ मृत्यू

मुंबई - गेल्या वर्षभरात क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या ५६ हजारावर झाली तर या रोगाने २५६३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनापाठोपाठ मुंबईत आता क्षयरोगाचे भय निर्माण झाले आहे. हा रोग रोखण्यासाठी रुग्णांना कोणत्या व्हेरिएंची लागण झाली त्याचा शोध घेण्यासाठी कस्तूरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे निदान लवकर रुग्ण लवकर बरे होवून रोग आटोक्यात येवू शकतो, असा विश्वास पालिकेच्या आरोग्य खात्याने व्यक्त केला आहे.

क्षयरोग निर्मूलन मोहिम पालिका अनेक वर्षांपासून राबवित आहे. हा रोग वाढू लागल्याने पालिकेच्या आरोग्य खात्याने कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली. मुंबईत घरोघरी जावून ‘आशा’ सेविकांच्या माध्यमातून रुग्णांचा शोध घेतला जात आहे. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून सुमारे ५० टक्के रुग्ण खासगी रुग्णालयांत आले असल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षभरात मुंबईत एकूण ५६ हजार रुग्ण आढळलले असून २५६३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

२०२५ पर्यंत मुंबई होणार टीबीमुक्त

-पालिकेने २०२५ पर्यंत मुंबईला टीबीमुक्त करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये प्रत्येक एक लाख नागरिकांमध्ये जास्तीत जास्त सर्वेक्षण करून किमान साडेतीन हजार टीबी बाधित शोधून त्यांना टीबीमुक्त होईपर्यंत मोफत उपचार देण्यात येत आहेत.

उपाययोजना

- टीबी संशयित रुग्णाचे एक्स-रेच्या माध्यमातून केवळ तीन मिनिटांत निदान करता येते.

- शिवडी रुग्णालयात लहान मुलांसाठी खास पेडियाट्रिक वॉर्ड सुरू करण्यात येणार आहे.

- प्रसारमाध्यमे, पथनाट्य, रॅली, मेळावे अशा माध्यमातून जनजागृती, निदान-उपचारासाठी प्रोत्साहन.

- ‘क्षयमित्र’ उपक्रमातून टीबी रुग्णांना दरमहा आर्थिक मदत, उपचारासाठी मदत, मार्गदर्शन.

टॅग्स :MumbaiPatientTuberculosis