esakal | एचआयव्ही रुग्णांमधील मधुमेह, उच्च रक्तदाब शोधण्यासाठी मोहीम
sakal

बोलून बातमी शोधा

HIV

एचआयव्ही रुग्णांमधील मधुमेह, उच्च रक्तदाब शोधण्यासाठी मोहीम

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई :  मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी (एमडॅक्स) आता मुंबईत एचआयव्ही ग्रस्त (HIV people) लोकांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह शोधण्यासाठी (Diabetes) मोहीम सुरू करणार आहे. जर एखाद्या व्यक्तीमध्ये वरील आरोग्य समस्या (health problem) आढळल्या तर त्याला सर्व उपचार एकाच ठिकाणी मिळतील.

हेही वाचा: शिक्षक-शिक्षकेतरांच्या प्रवासाचा प्रश्न सोडवा; मुख्यमंत्र्यांना पत्र

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या मुंबईकरांमध्ये वाढत आहे. विविध मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेकडून मुंबईकरांची तपासणी केले जाते, परंतु तेथे एचआयव्ही रुग्णांची सतत तपासणी होत नाही. मुंबईत एकूण 36,300 लोक एचआयव्हीसह जगत आहेत. यापैकी 35071 रुग्णांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे.

हेही वाचा: BMC : सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाला स्थायी समितीची मंजुरी

एमडॅक्सच्या सहसंचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले की, पूर्वी एचआयव्ही बाधित उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी नियमित केली जात नव्हती. आम्ही पाहिले आहे की मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या लोकांमध्ये वाढत आहे, हे लक्षात घेऊन आम्ही प्रौढ एचआयव्ही बाधित लोकांची सतत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

एआरटी केंद्रावर मिळणार औषधे

"जर चाचणीत उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असल्याचे आढळले, तर त्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन केले जाईल. रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फिरावे लागणार नाही. आम्ही त्यांना एकाच ठिकाणी चाचण्यांपासून औषध पुरवण्याची योजना आखली आहे. एचआयव्ही सोबत, उच्च रक्तदाब आणि मधुमेहासाठी औषधे देखील एआरटी केंद्रात उपलब्ध असतील."

- डॉ. श्रीकला आचार्य, सहसंचालक, एमडॅक्स

loading image
go to top