मुंबईत साथीच्या आजारांचे संकट कायम; रुग्णसंख्या 21 दिवसांत तिप्पट! | Mumbai health update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dengue, malaria patients

मुंबईत साथीच्या आजारांचे संकट कायम; रुग्णसंख्या 21 दिवसांत तिप्पट!

मुंबई : मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टो चिकनगुनिया या साथीच्या आजारांचे (infectious disease) रुग्ण गेल्या 21 दिवसांत तिप्पट (patients increases) झाले आहेत. त्यामुळे, या आजारांचा मुंबईत धोका (risk in Mumbai) कायम असून मुंबईकरांनी पाणी उकळून व गाळून प्यावे (water filtration), असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने (bmc health authorities) केले आहे.

हेही वाचा: आर्यन खान प्रकरणात NCBचं थोबाड फुटलंय!

मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी साथीचे आजार डोके वर काढत आहेत. गेल्या 21 दिवसांत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत दुपटीने वाढ झाली असून 1 ते 21 नोव्हेंबर दरम्यान मलेरियाचे 234, डेंग्यू - 91, गॅस्ट्रो - 200, चिकनगुनीया - 12 तर लेप्टोचे 6  रुग्ण आढळल्याने मुंबईत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचा धोका कायम आहे.

गेल्या वर्षभरापासून मुंबईकर कोरोना विरोधात लढा देत आहेत. मुंबईकरांची साथ व योग्य उपचार पद्धती यांमुळे कोरोनाची पहिली व दुसरी लाट रोखण्यात यश आले. तर तिसरी लाट येण्यापूर्वीच परतवण्यात पालिकेला यश आले आहे. परंतु पावसाळ्यात उद्भवणारे साथीच्या आजारांचे संकट आजही कायम आहे. त्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी ज्या पद्धतीने खबरदारी घेतली त्याचप्रमाणे साथीच्या आजार रोखण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

1 ते 21 नोव्हेंबरची आकडेवारी!

मलेरिया - 234

डेंग्यू  - 91

गॅस्ट्रो - 200

कावीळ - 24

चिकनगुनीया - 12

लेप्टो - 6

स्वाईन फ्ल्यू - 1

loading image
go to top