पोटातून काढली 11 किलोची गाठ... बघून थक्क व्हाल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tumor surgery

पोटातून काढली 11 किलोची गाठ... बघून थक्क व्हाल!

मुंबई : पोट दुखीमुळे गेल्या काही महिन्यांपासून त्रस्त 55 वर्षीय व्यक्तीच्या पोटातून तब्बल 11 किलो वजनाची गाठ (eleven kilogram tumor) काढण्यात आली आहे. घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात (rajawadi hospital) ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान, या व्यक्तीचे आरोग्य शस्त्रक्रियेला (health surgery) साथ देईल की नाही, अशी भीती सतावत होती, परंतु शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्यांचे आरोग्य ठणठणीत केले आणि यशस्वी शस्त्रक्रिया (successful surgery) करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा: डोंबिवली : मानपाडा पोलिसांवर हल्ला; झारखंडमध्ये आरोपीला ठोकल्या बेड्या

चेंबूर येथे राहणारे सुग्रीव निर्मल (55) हे गेल्या काही महिन्यांपासून पोट दुखीमुळे त्रस्त होते. असिडिटीचा त्रास असवा असा समज करुन त्यांनी दुर्लक्ष केले. परतु त्रास वाढल्याने त्यांना घाटकोपर येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुग्रीव निर्मल यांना रुग्णालयात दाखल केले त्यानंतर तपासणी केली. या तपासणीत त्यांच्या पोटात गाठ असल्याचे निदर्शनास आले. यानंतर डॉ. अजय गुजर व डॉ. सुंदरम पिल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु करण्यात आले.‌ निर्मल रुग्णालयात दाखल झाले त्यावेळी त्यांची तबेत खालावली असल्याने लगेच शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते.

देखरेखीखाली ठेवत 15 दिवसांनी शस्त्रक्रियेची तारीख फिक्स करण्यात आली आणि रक्त देत त्यांचे हिमोग्लोबिन वाढवण्यात आले. त्यानंतर दीड तास शस्त्रक्रिया करत ११ किलो वजनाची गाठ काढण्यात आल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान, सरकारी रुग्णालयात आतापर्यंत झालेल्या शस्त्रक्रियेत राजावाडी रुग्णालयात ही सर्वांत मोठी शस्त्रक्रिया झाल्याचे त्या म्हणाल्या.

loading image
go to top