Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

Mumbai Weather Update: हवामान विभागाने मुंबईत पुढील ४८ तासात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा दिला आहे.
Mumbai Rain

Mumbai Rain

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच आज पहाटेपासून मुंबई शहरासह उपनगरात पावसाची संततधार कोसळत आहे. परिणामी अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून वाहनचालकांसह नागरिकांचे हाल होत आहेत. अशातच मुंबईत पुढील ४८ तासात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा हवामान विभागाने इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com