Mumbai Rain: पावसाची दुसरी इनिंग सुरू! मुंबईतील जलसाठ्यात दिवसेंदिवस वाढ, ७ धरणांची आकडेवारी समोर

Mumbai Dam Water Level: मुंबईतील पावसामुळे जलसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत असून ७ जलाशयांचा साठा ५७.७५ टक्के इतका झाला आहे. मागील २४ तासात या साठ्यात ३.७० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Mumbai Dam Water Stock

Mumbai Dam Water Stock

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सुमारे ५७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात सुमारे ३.७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत पावसाने तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दडी मारल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते; पण आता पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने तलावांतील जलसाठा वाढू लागला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com