Mumbai Rain: पावसाचा फटका मुंबईकरांना! 15-20 मिनिटे उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे स्टेशनवर प्रचंड गर्दी; प्रवाशांची तारांबळ

Mumbai Local Train Delay: मुंबईतील मुसळधार पावसामुळे लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी निर्माण झाली आहे.
Mumbai Local Train Delay

Mumbai Local Train Delay

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने (Mumbai Rain) हजेरी लावली आहे. मुंबई उपनगरासह संपूर्ण शहरात पावसाचा जोर कायम असल्याचे दिसत आहे. परिणामी अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून रेल्वेसह रस्ते वाहतुकीवर परिणाम होत आहे. मुंबईत शुक्रवार (ता. २) रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकल वाहतुकीला फटका बसला आहे. तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल उशोरने धावत असल्यामुळे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com