

Mumbai Dam Water Level
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरात पावसाच्या संततधार कोसळत असल्यामुळे अनेक भागात पाणी साचले असून नदी-नाले देखील तुडुंब भरले आहेत. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही चांगला पाणीसाठा साठला असून मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकट दूर होण्याची शक्यता आहे.