
मुंबई : मुसळधार पावसाने आज सकाळपासून मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. सखल भाग जलमय झाले. रेल्वे रुळांवर पाणी भरले. त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा अक्षरशा बोजवारा उडाला. मुंबईला रेड अलर्ट दिला असून मुंबईतील शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी दिली आहे. पुढील सहा तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश पालिकेने दिले आहे