

Mumbai Dam Water Level
ESakal
मुंबई : शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांत मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक भागांत पाणी साचले, जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या ७ प्रमुख जलाशयांचा विचार केला, तर गेल्या २४ तासांत या धरणांमधील पाणीसाठ्यात अवघी ३.७८ टक्केच वाढ झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण सात तलावांची एकूण साठवणूक क्षमता खूप मोठी असल्याने, सुरुवातीच्या मोठ्या पावसानंतरही टक्केवारीचा आकडा छोटा का दिसतो, याचे रंजक जल-गणित समोर आले आहे.