
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कुर्ला आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. पावसामुळे फुलेनगर परिसरात एका व्यक्तीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला, तर मिठी नदीत एक तरूण वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.