Mumbai heavy rainfall red alert today
esakal
मुंबई : मुंबईत गेल्या काही तासांत मान्सूनने अत्यंत रौद्र रूप धारण केले असून, विशेषतः पश्चिम आणि पूर्व उपनगरांना पावसाने झोडपून काढले (IMD red alert for Mumbai rain) आहे. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर कमालीचा वाढला असून कांदिवली, मालाड आणि घाटकोपर परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी पुढील ३ तासांचा 'रेड अलर्ट' जारी केला असून, अत्यंत तीव्र स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.