
Mumbai Traffic News: मुंबई आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी ते वांद्रे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, वाहतूक कोंडीने मुंबईकरांचा खोळंबा झाला आहे. अंधेरी सबवे पाणी साचल्याने बंद करण्यात आला असून, सखल भागातील रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.