
मुंबईत जोरदार रात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. याचा लोकलसेवेवरही परिणाम झाला असून प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी म्हणून जुहू बीचवर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अरबी समुद्रात उंच लाटा उसळत आहेत, सकाळी ११:२४ वाजता भरतीचा इशारा देण्यात आला आहे. त्यावेळी लाटा ४.७५ मीटर उंचीवर पोहोचण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.