esakal | आज दिवसभरात मुंबईत कसा होता पाऊस, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट
sakal

बोलून बातमी शोधा

आज दिवसभरात मुंबईत कसा होता पाऊस, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

मुंबईत आज दिवसभर पावसाची रिपरीप सुरु होती. मंगळवारपासून मुंबईसह नवी मुंबईतील पावसाचा जोर कमी होणार असून पुढील तीन दिवस हलक्‍या सरी कोसळण्याची शक्‍यता आहे.

आज दिवसभरात मुंबईत कसा होता पाऊस, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई: मुंबईत आज दिवसभर पावसाची रिपरीप सुरु होती. मंगळवारपासून मुंबईसह नवी मुंबईतील पावसाचा जोर कमी होणार असून पुढील तीन दिवस हलक्‍या सरी कोसळण्याची शक्‍यता आहे.  जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसानं ऑगस्टमध्ये जोरदार बँटिग सुरू केली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा  जोर कायम आहे. 

मुंबईत आज चेंबूर येथे सर्वाधिक 89.8 मि.मी पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल शिवाजी पार्क येथे 71 मि.मी पाऊस नोंदविण्यात आला. बीकेसी येथे 60 मि.मी आणि दहिसर येथे 70 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. दिवसभर मुंबईत पावसाळी ढग दाटून रिपरीप सुरु होती. मुंबई परिसरात गेल्या आठवड्याभरापासून पावसाची रिपरीप सुरु आहे. मुंबई आणि पालघरमध्ये मंगळवार बुधवारी गुरुवार पर्यंत हलक्‍या सरी कोसळून पुन्हा पावसानं जोर धरण्याची शक्यता आहे.  ठाणे जिल्ह्यात दोन दिवस हलक्‍या सरी कोसळून गुरुवारपासून पुन्हा पाऊस जोर धरणार आहे. 

हेही वाचाः  तारापूर MIDC मधील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; जवळची गावे हादरली

रायगड,रत्नागिरी,सिंधुदूर्ग जिल्ह्यात मंगळवारी अतिवृष्टीची शक्‍यता असून या जिल्ह्यातील काही भागात 204 मि.मी पर्यंत पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.या जिल्ह्यासाठी अंबर अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारपासून या भागात पावसाचा जोर कमी होणार असला जोरदार सरी कोसळत राहतील असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

नैऋत्य मौसमी वारे सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सक्रीय आहे. यामुळे येत्या आठवड्यातही पाऊस राज्यात सक्रिय असेल असा अंदाज आहे. बुधवारपर्यंत कोकण, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीची होणार असून मुंबईत, रायगड आणि पुण्यात मंगळवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढचे आणखी दोन दिवस असाच मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

अधिक वाचाः  अरे वाह! मध्य रेल्वेच्या ताफ्यात हायटेक ड्रोन दाखल, पाहा फोटो

मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ६१ टक्के पाऊस पडला आहे. महिन्याला सरासरी ५८५.२ मिमी पावसाची नोंद होते. मात्र, ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३५७ मिमी पाऊस पडल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे. तसंच पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसानं मुंबईची तुंबई झाली होती. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. त्यांच्यासाठी NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या होत्या.

(संपादनः पूजा विचारे) 

Mumbai heavy rainfall raigad palghar Imd predicts