

mumbai high court
esakal
मुंबई : एप्रिल २००३ पासून गायब असलेल्या एका व्यक्तीला मृत म्हणून घोषित करण्याच्या मागणीसाठी त्यांच्या मुलाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेले अपील न्यायालयाने मंजूर केले आहे. या प्रकरणात न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयाला उलटवून, मुलाच्या बाजूने निकाल दिला. या निकालामुळे बेपत्ता व्यक्तीच्या कुटुंबाला कायदेशीर वारसा आणि इतर प्रक्रियांसाठी दिलासा मिळू शकतो. न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने हा आदेश जारी केला असून, त्यात पुरेशा पुराव्यांच्या आधारे मृत्यूचे अनुमान काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.