esakal | ....म्हणून कपिल आणि धीरज वाधवान यांना मिळाला सशर्त जामीन
sakal

बोलून बातमी शोधा

....म्हणून कपिल आणि धीरज वाधवान यांना मिळाला सशर्त जामीन

येस बैक गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

....म्हणून कपिल आणि धीरज वाधवान यांना मिळाला सशर्त जामीन

sakal_logo
By
सुनीता महामुणकर

मुंबई : येस बैक गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. मात्र सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात दोघेही अटकेत आहेत, त्यामुळे त्यांची कारागृहातून सुटका होणार नाही.

दिवाण हाऊसिंग फायनान्स लि.चे प्रवर्तक असलेल्या कपिल आणि धीरज विरोधात ईडीने साठ दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल न केल्यामुळे न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. दोघांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जामीन आणि हमीदार शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला. तसेच त्यांचे पारपत्र तपास यंत्रणेकडे देण्याचे निर्देश दिले आहे. 

मोठी बातमी - ठाण्याचे आयुक्त ऑनफिल्ड! एका दिवसात 850 खड्डे बुजवले; बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनाही सुनावले

कायद्यानुसार निर्धारित कालावधीमध्ये आरोपपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. जर  आरोपपत्र दाखल केले नाही तर आरोपींना आपसूकच जामीन मंजूर होतो, असे निरीक्षण न्या भारती डांग्रे यांनी नोंदविले आहे. या निर्णयावर दोन आठवड्यांची स्थगिती देण्याची मागणी ईडीच्या वतीने करण्यात आली. मात्र न्यायालयाने ही मागणी अमान्य केली. आरोपपत्र दाखल न झाल्यामुळे आरोपीला जामीनाचा अधिकार आहे, असे न्यायालय म्हणाले.

वाधवान बंधुंविरोधात याच प्रकरणात सीबीआयनेही गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे जामीन मिळाला तरी कारागृहातून त्यांची सुटका होऊ शकणार नाही.

( संकलन - सुमित बागुल ) 

mumbai high court approved bail of kapil and dheeraj wadhwan

loading image
go to top