विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणात नवा ट्विस्ट, प्रत्यार्पणाची बातमी अफवा 

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणात नवा ट्विस्ट, प्रत्यार्पणाची बातमी अफवा 

मुंबई- देशातल्या अनेक बँकांना 9000 कोटींचा गंडा लावून फरार झालेला कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्याला अखेर भारतात आणण्यात येणार अशा बातम्या समोर आल्या. मात्र आता हे वृत्त एक अफवा असल्याचं बोललं जातं आहे.  एका वृत्तवाहिनीने मुंबईत येण्यासाठी मल्ल्या विमानात बसला असून त्याचं विमान कोणत्याही क्षणी मुंबईत दाखल होईल असं वृत्त दाखवण्यात आलं. 

मल्ल्याला भारतात आणल्यानंतर मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये त्याची रवानगी करण्यात येणार आहे. मल्ल्याविरोधात मुंबईत गुन्हे दाखल करण्यात आले पुढच्या 24 तासांमध्ये त्याला मुंबईत आणण्यात येईल. विमानतळावर त्याची मेडिकल टेस्ट होणार आहे. या दरम्यान मल्ल्यासोबत सीबीआय आणि ईडीचे अधिकारीही सोबत असणार आहे. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल. मुंबईतल्या ऑर्थर रोड जेलमध्ये त्याला एका विशेष कोठडीत ठेवण्यात येईल, असं वृत्तात म्हटलं गेलं. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार मल्ल्याची पर्सनल असिस्टंटन सांगितलं की, विजय मल्ल्या आज रात्री भारतात जाण्याविषयी मला काहीही माहित नाही. त्यांच्या प्रत्यार्पणासंबंधी मला काहीही कल्पना नसल्याचं तिनं सांगितलं. 

बुटीक लॉमधील विजय मल्ल्याचे वकील आनंद दुबे यांनी फोन उचलणं टाळलं. बुधवारी रात्री विजय मल्ल्याला भारतात आणण्याचं वृत्त सत्य आहे का असं विचारल्यास मल्ल्यानं व्हॉट्सअॅप मॅसेजमध्ये या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला रिप्लाय दिला की, जे बोलतात त्यांनाच ते फक्त माहित असतं.

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं की, 64 वर्षीय मल्ल्या बुधवारी रात्री किंवा लवकरात लवकर प्रत्यार्पण होणार नाही आहे.  पुढे ते म्हणाले की, आतापर्यंत कोणतंही प्रत्यार्पण झालेलं नाही. मीडियानं सीबीआयच्या जुन्या वक्तव्यांच्या आधारानं वृत्त प्रकाशित केले. अजूनही परिस्थिती बदलली नसून प्रत्यार्पणाला अजून वेळ आहे. 

या इंग्रजी वृत्तपत्राने आपल्या बातमीत म्हटलं की, गृहसचिव प्रीती पटेल यांनी   कायदेशीर कारणांमुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर सही केली नाही. यामागे असं कारण असू शकतं की, मल्ल्या आश्रयासाठी अर्ज करू शकेल कारण त्याच्याविरूद्ध काही प्रकरणं यूकेच्या न्यायालयात प्रलंबित आहेत.  विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही, असं मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.

आर्थर रोडमध्ये रवानगी होणार 

भारतात आणल्यानंतर मल्ल्याला मुंबईतल्या ऑर्थर रोड जेलमध्ये त्याला एका विशेष कोठडीत ठेवण्यात येईल. ED आणि सीबीआय कोर्टात त्याची कस्टडी मागणार असून आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी केली जाणार आहे.

इंग्लंडमधल्या न्यायालायानं विजय मल्ल्याच्या भारतातील प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर नियमांनुसार मल्ल्याला 28 दिवसांमध्ये भारतात आणणं गरजेचं होतं, त्यातील 20 दिवस आधीच निघून गेलेत. सद्यपरिस्थितीत प्रत्यार्पणाची सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असल्यानं विजय मल्ल्या कधीही भारतात परतू शकतो.

किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्यावर देशातील 17 बँकांचे 9000 कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. कर्ज न फेडताच तो भारतातून पळून गेला होता. 3 मार्च 2016 मध्ये मल्ल्यानं भारत सोडून ब्रिटनमध्ये पलायन केलं होतं. 14 मे 2020 रोजी इंग्लंडनं मल्ल्याचा भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com