esakal | पाठोपाठ सुट्ट्या आल्याने मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज ५ दिवस बंद
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai high court

पाठोपाठ सुट्ट्या आल्याने मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज ५ दिवस बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : चालू आठवड्यात एका मागोमाग एक असलेल्या सणांमुळे मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सलग पाच दिवस बंद राहणार आहे. यामुळे न्यायालयाला मोठी सुट्टी मिळणार आहे.शुक्रवारी येणारा दसरा आणि पुढील आठवड्यात असलेली ईददरम्यान न्यायालयाला मोठी सुट्टी मिळणार असल्याचे उच्च न्यायालयाने परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

येत्या शुक्रवारी दसरा तर पुढील मंगळवारी ईद-ए-मिलादनिमित्त न्यायालयाचे कामकाज बंद राहणार आहे. तर शनिवार 16 ऑक्टोबर आणि सोमवारी 18 ऑक्टोबरलाही न्यायालयाचे काम होणार नाही. मात्र, 16 आणि 18 ऑक्टोबरच्या कामाकाजचे दिवस अनुक्रमे 27 नोव्हेंबर आणि 4 डिसेंबर या दोन शनिवारी काम करण्यात येणार आहे, असेही न्यायालय प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद आणि गोवा खंडपीठासाठी आहेत.

loading image
go to top