९० वर्षीय महिलेला २०४६ची तारीख, २० वर्षे प्रकरण सुनावणीला घेऊ नये; मुंबई हायकोर्टानं कारणही सांगितलं

Mumbai High Court: मानहानीचा वाद सामंजस्याने सोडवण्यास तयार नसल्याची ठाम भूमिका एका नव्वद वर्षांच्या महिलेने मुंबई उच्च न्यायालयात घेतली. या प्रकरणी आता २० वर्षे सुनावणीच घेऊ नये असं मुंबई हायकोर्टाने म्हटलंय.
Mumbai High Court

high court

Esakal

Published on

सकाळ वृत्तसेवा, मुंबई, ता. २८ : सोसायटीच्या सदस्यांसोबतचा मानहानीचा वाद सामंजस्याने सोडवण्यास तयार नसल्याची ठाम भूमिका एका नव्वद वर्षांच्या महिलेने मुंबई उच्च न्यायालयात घेतली. तिच्या या आडकाठी भूमिकेवर नाराजी व्यक्त करून हा खटला २०४६ म्हणजे पुढील २० वर्ष पुढे ढकलला. जेव्हा, पक्षकार सामंजस्याने सोडवता येण्यासारखे मुद्दे, प्रश्न उगाच लांबवण्याचा निर्णय घेतात. तेव्हा, न्यायव्यवस्थेत विनाकारण अडथळा निर्माण होतो, असेही निरीक्षण न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने २०४६ची पुढची तारीख देताना नोंदवले. The Mumbai High Court postponed the hearing for 20 years.

तारिणीबहेन देसाई आणि इतरांनी २०१७ मध्ये त्यांच्या सोसायटीच्या काही सदस्यांविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीवर सुनावणी सुरू होती. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या पक्षकारांमधील अहंकाराच्या लढाईमुळे न्यायव्यवस्थेत अडथळा निर्माण झाला. पक्षकारांची अशी हट्टी भूमिका न्यायालयाला अधिक प्राधान्य आणि आवश्यक असलेल्या प्रकरणांवर सुनावणी घेण्यापासून रोखते, असे निरीक्षणही न्या. जैन यांनी नोंदवले.

Mumbai High Court
Vidhan Parishad शिंदेंच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांचे हुकमी एक्के, भाजपचा ताकद वाढवण्याचा प्रयत्न

यापूर्वी, न्यायालयाने पक्षकारांना हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्यास सांगितले होते. बिनशर्त माफी मागून या खटल्याचा निपटारा होऊ शकतो, असे म्हटले होते. तथापि, प्रतिवादी जे जवळपास ९० वर्षांचे आहेत, ते अजूनही मानहानीचा खटला पुढे चालवण्याचा आग्रह धरत आहेत. पुढील २० वर्षांसाठी हे प्रकरण सुनावणीसाठी घेऊ नये, याव्यतिरिक्त मी अधिक काही सांगू इच्छित नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. हे प्रकरण २०४६पर्यंत तहकूब करताना, याचिकाकर्ते ज्येष्ठ नागरिक आहेत या कारणास्तव या प्रकरणाला कोणत्याही परिस्थितीत प्राधान्य देऊ नये, असेही शेवटी न्यायालयाने अधोरेखित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com