

BJP Move in Thane Seen as Political Challenge for Eknath Shinde
Esakal
सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. २८ ः विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवारांची घोषणा करताच महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या यादीवर नजर टाकली असता भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभावक्षेत्रातच आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. ठाण्यातून माधवी नाईक तर कोकणातून प्रमोद जठार या दोन शिलेदारांचा पाच जणांच्या उमेदवारी यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यातून आणखी एक भाजप आमदार विधान परिषदेवर जाणार असून ही संख्या तीनवर पोहोचणार आहे. शिवसेना शिंदे गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हे आव्हान समजले जात आहे.