मोठी बातमी - लवकरच रेमडेसिवीर औषधाच्या चाचण्या होणार सुरु...

मोठी बातमी - लवकरच रेमडेसिवीर औषधाच्या चाचण्या होणार सुरु...

मुंबई: लवकरच रेमडेसिवीर या औषधाच्या कोरोना विषाणूविरोधी (ॲंटिव्हायरल) चाचण्या सुरू होणार आहेत. त्याबाबतचा अहवाल दोन-तीन दिवसांत भारतीय औषध नियंत्रकांना सादर होईल. सरकार बांगलादेशातील बेक्झिम्को या कंपनीकडून रेमडेसिवीर खरेदी करणार आहे. हे औषध कोरोनाच्या रुग्णांना गुणकारी ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्यातील 18 वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांत रेमडेसिवीर पुरवले जाईल. त्याचा वापर फक्त गंभीर रुग्णांवर केला जाणार आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास भारतीय कंपन्या रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू करतील. 

भारतीय औषध प्राधिकरणाने 15 दिवसांपूर्वी मान्यता दिल्यानंतर सरकारचा रेमडेसिवीरच्या वापराचा मार्ग मोकळा केला आहे. हे अँटिव्हायरल औषध कोव्हिड-19 विषाणू संसर्गावर परिणामकारक ठरत असल्याचे सांगितले जाते. राज्यात त्याचा आपत्कालीन परिस्थितीतच वापर केला जातो. या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या राज्य सरकारच्या सर्व आणि मुंबई महापालिकेच्या चार वैद्यकीय महाविद्यालयांत केल्या जाणार आहेत. गेल्या महिन्यात कोव्हिड-19 टास्क फोर्सने रेमडेसिवीर आणि फेविपिरेवीर ही औषधे लवकरात लवकर उपलब्ध करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

रेमडेसिवीर या औषधाच्या चाचण्या राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत लवकरच सुरू होतील. त्यासाठी भारतीय औषध नियंत्रकांची परवानगी घेण्यात येईल. या चाचण्यांच्या कार्यपद्धतीबाबत वैद्यकीय तज्ज्ञ निर्णय घेतील. ही कागदपत्रे औषध नियंत्रकांना दोन-तीन दिवसांत सादर केली जातील. त्यांची परवानगी मिळाल्यानंतर प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयातील एथिक्स कमिटी निर्णय घेईल. अशा प्रकारे या चाचण्या संपूर्ण राज्यात घेण्यात येतील. - डॉ. आकाश खोब्रागडे, समन्वय अधिकारी

मुंबईतील बीडीआर फार्मास्युटिकल्स आणि हैदराबाद येथील हेटेरो या दोन्ही कंपन्यांनी पुरवलेलय 3000 बाटल्या रेमडेसिवीर रुग्णांना मोफत दिल्या जातील. या औषधाच्या चाचण्या नक्की कधी सुरू होतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही मोजक्या रुग्णालयांमधील एथिक्स समित्यांना चाचण्यांना मान्यता देण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर राज्य सरकार या दोन कंपन्यांकडून रेमडेसिवीर पुरवण्यास भारतीय औषध नियंत्रकांची परवानगी घेईल. चाचण्यांच्या अहवालानंतर कंपन्यांना हे औषध तयार करण्याची आणि वितरणाची परवानगी देईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

testing of remdesivir drug on covid 19 positive patients will start soon

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com