गुन्हा रद्दबातल करण्यासाठी मुंबई हायकोर्टात समीर खान यांची याचिका | Mumbai High court | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan Khan, Sameer Khan

गुन्हा रद्दबातल करण्यासाठी मुंबई हायकोर्टात समीर खान यांची याचिका

मुंबई : अमलीपदार्थ प्रकरणात (Drug case) अटक करण्यात आलेले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांनी आता गुन्हा रद्दबातल (FIR cancellation) करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) याचिका दाखल (petition) केली आहे.

हेही वाचा: मिरा-भाईंदर, वसई-विरार परिसरात ड्रोनवर बंदी

समीर यांच्याकडून कोणतेही अमलीपदार्थ सापडले नाही त्यामुळे त्यांचा रासायनिक अहवाल नकारात्मक आहे, त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असा दावा याचिकेत केला आहे. या अहवालानुसार त्यांच्या वर एनडिपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोगस आणि खोटी तक्रार दाखल केली आहे, असे याचिकेत म्हटले आहे. खान मागील नऊ महिने कारागृहात होते. विशेष न्यायालयाने नुकताच त्यांना जामीन मंजूर केला आहे.

याप्रकरणातील एका सह आरोपीने खान यांचे नाव घेतले होते. त्याच्या जबाबावरुन एनसीबीने खान यांना अटक केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार कोणत्याही आरोपीचा जबाब पुरावा होऊ शकत नाही. त्यामुळे माझ्यावर पुरावे नसताना जाणीवपूर्वक आरोप केले आहेत असा दावा खान यांनी केला आहे. केवळ अन्य आरोपींनी आरोप केले या हेतूने माझ्यावर गैरप्रकार कारवाई केली आहे, माझ्याजवळ कोणतेही अमली पदार्थ सापडले नाहीत, त्यामुळे हा गुन्हा रद्द करावा अशी मागणी केली आहे. एनसीबीने खान यांच्यावर कटकारस्थानाचा आणि अमलीपदार्थ बाळगल्याचा आरोप केला आहे.

loading image
go to top