Mumbai High Court
esakal
मुंबई : ब्रीच कँडी परिसरातील सध्या सैदाळे सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला. या गृहनिर्माण संस्थेने सर्वसाधारण बैठकीत पुनर्विकास प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर केल्याची दखल न्यायालयाने घेतली आणि सोसायटीला पुनर्विकास पुढे नेण्यास परवानगी दिली.