esakal | गौतम नवलखा यांच्या याचिकेवर एनआयए आणि राज्य सरकारने खुलासा करावा- हायकोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam-Navlakha

गौतम नवलखा यांच्या याचिकेवर एनआयए आणि राज्य सरकारने खुलासा करावा- हायकोर्ट

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : तळोजा कारागृहात (Taloja jail) वृद्ध आणि आजारी कैद्यांची (Sick Prisoners) योग्य प्रकारे काळजी घेतली जात नाही, त्यामुळे कारागृहात ठेवण्याऐवजी मला घरामध्ये नजरकैदेत ठेवा, अशी मागणी करणारी याचिका (petition) एल्गार परिषद प्रकरणातील (Elgar parishad) आरोपी गौतम नवलखा (Gautam Navlakha) यांनी केली आहे. न्यायालयाने (high court)आज एनआयए (NIA) आणि राज्य सरकारला (Government) याबाबत खुलासा करण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा: म्युकरमायकोसिसचा धोका वाढतोय; महिनाभरात २९८ नवे रुग्ण, ७४ जणांंचा मृत्यू

सत्तर वर्षी पत्रकार नवलखा यांनी तब्येत ठीक नसल्याचे कारण दिले असून छातीत दुखत असूनही कारागृह प्रशासन उपचार करत नाही अशी तक्रार केली आहे. कारागृहात पुरेशी पायाभूत सुविधांची वानवा आहे, अपुरे मनुष्यबळ आणि ज्येष्ठ बंद्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेचा अभाव यामुळे बंद्यांची प्रचंड गैरसोय होत आहे, असे याचिकेत म्हटले आहे. प्रक्रुती, वय आणि आजारपण या कारणांमुळे आरोपीला नजरकैदेत ठेवले जाऊ शकते या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार याचिकेत दिला आहे.

आज न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. चालू वर्षी मार्चपासून नवलखा यांना छातीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यावर उपचार होण्याची गरज आहे, त्यामुळे जसलोक रुग्णालयात त्यांना हलविण्यात यावे अशी मागणी नवलखा यांच्या वतीने एड युग चौधरी यांनी केली. टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होऊ शकतात असे प्रमुख सरकारी वकील अरुणा पै यांनी खंडपीठाला सांगितले.

याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्यांवर राज्य सरकार आणि एनआयएला नोटीस बजावली आणि दोन आठवड्यात यावर भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले. दरम्यान शुक्रवारी सकाळी नवलखा यांना टाटा रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली. कारागृह प्रशासनाला वेळोवेळी तोंडी आणि लेखी विनंती अर्ज केले पण त्याची दखल घेतली नाही, या खटल्याची कारवाई लवकर संपणार नाही त्यामुळे घरातच नजरकैदेत ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

loading image
go to top