समाजात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून मुंबई हायकोर्टाने घेतला महत्त्वाचा निर्णय

समाजात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून मुंबई हायकोर्टाने घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबई : बलात्काराच्या आरोपात जामीन मिळाल्यावर तोच गुन्हा पुन्हा करणाऱ्या एकवीस वर्षी युवकाला सत्र न्यायालयाने जामीन नाकारला. पहिल्या गुन्ह्यात अटक होऊनही आरोपीने काही धडा घेतला नाही, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले.

पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल झालेल्या आरोपीवर याआधी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात आरोपीला अटकही झाली होती. याप्रकरणी त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. परंतु जामीन मिळाल्यानंतर आरोपीने पुन्हा तशाच प्रकारचा गुन्हा केला. आरोपीने त्याच्या अल्पवयीन मैत्रिणीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून तीला ब्लॅकमेल करत होता. याबाबत तक्रार दाखल केल्यावर त्याला अटक करण्यात आले. 

विशेष न्या. एम. ए. बरालिया यांनी आरोपीच्या क्रुत्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोपीने पहिल्या अटकेतून काही धडा शिकल्याचे दिसत नाही. उलट जामीन मिळाल्यावर लगेच त्याने पुन्हा अल्पवयीन मुलींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढायचे, प्रेमात पाडायचे आणि त्यांचे व्हिडीओ करुन त्यांना ब्लॅकमेल करायचे, ही त्याची मोडस ऑपरेंडी दिसते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

जर पुन्हा त्याला जामीन मंजूर केला तर समाजात चुकीचा संदेश जाईल, असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले. अभियोग पक्षाने जामीनाला विरोध केला. आरोपीला जामीन मिळाल्यास तो पुन्हा हा गुन्हा करेल, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

Mumbai High Court took an important decision so that the wrong message should not be sent to the society
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com