राजीनाम्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेससंदर्भात केलं मोठं वक्तव्य

राजीनाम्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेससंदर्भात केलं मोठं वक्तव्य

मुंबई:  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज आपला विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे विधानभवन येथे सुपूर्द केला. गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले हे राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होतील अशी चर्चा सुरू होती आणि त्यासाठी ते विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देतील असही म्हटलं जातं होतं. पण काल दिल्ली १० जनपथ येथे राहून गांधी यांची नानांनी भेट घेतल्यानंतर सगळ्या घडामोडींना वेग आला होता. अखेर आज दुपारी नाना पटोले यांनी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर विधानभवनात येऊन राजीनामा दिला आहे.

बूथ एजंट केलं तरी बूथ सक्षम करेन - नाना पटोले

पदाचा राजीनामा दिला नंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले की ' मी पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडलीय , यापुढे देखील शेतकऱ्यांसाठी झटत राहीन . शेतकऱ्यांमध्ये या 3 कायद्या संदर्भात जनजागृती करेन , त्यासाठी रान पेटवणार असल्याचं नाना पटोले म्हणालेत .'

नाना पटोले विदर्भातील एक आक्रमक बहुजन समाजाचे आक्रमक नेते असून , १९९९ पासून काँग्रेस पक्षाच्या सलोली मतदार संघाचे सातत्याने ते प्रतिनिधित्व करता आहेत. २००८ साली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर काँग्रेस वरिष्ट नेत्यांशी वाद झाल्याने त्यांनी काँग्रेसला राम राम ठोकून २००९ च्या विधान सभा निवडणुकीत भाजप कडून ते आमदार झाले.  २०१४ ला भाजपच्याच तिकिटावर लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले होते. पण पंतप्रधान मोदी यांच्या शेतकऱ्यांविरोधी भूमिकेमुळे नाराज होऊन भाजपला सोडचिठ्ठी देऊन मोदींशी दोन हात करणारे पाहिले पक्षातून बाहेर पडणारे नेते ठरले.  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा काँग्रेसमधून आमदार म्हणून निवडून आले. याच वेळी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानं भाजपशी दोन हात करणारे पाहिले नेते ठरल्याने नाना पटोले यांच्या गळ्यात विधानसभा अध्यक्ष पदाची माळ काँग्रेसने घातली.

एक वर्षाहून अधिक काळ विधानसभा अध्यक्ष असताना नाना पटोले यांनी आपल्या कार्यकाळात बऱ्याचदा त्यांच्या आक्रमक भूमिकेने मंत्र्यांवर एक नवी छाप पडण्याचा प्रयत्न केला. तसेच या पदावर असताना पक्ष संघटनेत अधिक काम करण्यासाठी आपण पूर्णपणे सक्षम असून ती संधी मिळत नसल्याने त्यांनी बऱ्याचदा उघड नाराजी जाहीर केली होती. अखेर त्यांची प्रदेश अध्यक्ष पदावर वर्णी लागणार असल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

नवा अध्यक्ष कोण? 

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा आहे. नवीन अध्यक्ष निवड होई पर्यंत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. येत्या अधिवेशनात नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. आता विधानसभा अध्यक्ष पदावर महाविकास आघाडी स्थापन झाली असताना किमान समान कार्यक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये विधासभा अध्यक्ष पद हे काँग्रेसकडे आहे. त्यामुळे काँग्रेसचाच विधानसभा अध्यक्ष झाल्यास अमीन पटले - मुंबादेवी मतदार संघ , सुरेश वरपूरकर - पाथरी मतदार संघ , संग्राम थोपटे - भोर मतदार संघ यांची नावं चर्चेत आहेत.

अध्यक्ष पद काँग्रेसकडेच राहणार?

किमान समान कार्यक्रम अंतर्गत स्थापन झालेल्या सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद आणि काही मंत्री मंडळातील खाती देण्यात आली आहे. मात्र नाना पटोले यांना मंत्रिपदाची अपेक्षा असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र काँग्रेसच्या गोटातील मंत्रिपदाची आणखी खाती उरलेली नाही आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीशी चर्चा करून विधानसभा अध्यक्ष पद इतर पक्षाला देऊन मंत्रीमंडळात एक पद मिळवलं जाऊ शकतं. पण आता आगामी काळात या सगळ्या संदर्भात नेमकं चित्र स्पष्ट होईल. 

-----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Nana Patole first reaction after resignation make big statement regarding Congress

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com