
मुंबई : गेल्या काही दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील बेघर नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पूलाखाली, पदपथावर, बसथांब्यांवर कुटुंबासह राहणारे नागरिक पावसात भिजत असल्याचे दिसले. मात्र, त्यांच्यासाठी महानगरपालिकेने पर्याप्त पुरेशी निवाऱ्यांची व्यवस्था केल्याचे दिसत नाही.