डॉक्टरच म्हणतात "मिटिंगला पोहोचण्यासाठीचा उशीर टाळण्यासाठी ऍम्ब्युलन्सचा वापर"

डॉक्टरच म्हणतात "मिटिंगला पोहोचण्यासाठीचा उशीर टाळण्यासाठी ऍम्ब्युलन्सचा वापर"

मुंबई- :सरकारी अधिकारी नेहमीच आपल्या स्वत:च्या किंवा राज्य सरकारनं दिलेल्या गाडीनं प्रवास करत असतात. मात्र मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन वर्षांपासून या रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड हे चक्क रुग्णवाहिकेचा उपयोग आपल्या खासगी कामासाठी करत असल्याचं उघड झालं आहे. तीन वर्षांच्या आधी मधुकर गायकवाड यांची सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या अधीक्षकपदी निवड झाली होती. तेंव्हापासूनच गायकवाड यांनी आपल्या खासगी कामांसाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर केल्याची घटना उघडकीस आली आहे. रुग्णवाहिकेच्या ड्रायवरच्या नोंदवहीतून ही माहिती समोर आली आहे.

तब्बल ३५५ वेळा केला रुग्णवाहिकेचा वापर:

रुग्णालयाकडे एकूण चार रुग्णवाहिका आहेत. त्या चारही रुग्णवाहिकांचा मधुकर गायकवाड यांनी तब्बल ३५५ वेळा वापर केला आहे. यात २४० वेळा वैयक्तिक कामांसाठी, ९० वेळा शासकीय कामासाठी तर २५ वेळा स्वत: वापरली आहे अशी माहिती समोर आली आहे. त्यांच घर जे. जे. रुग्णालयाच्या वसाहतीत आहे. त्यामुळे त्यांना अनेकदा रुग्णावहिकेनं  घरीही सोडण्यात आलं होतं असं ड्रायवरनं नोंदवहीत लिहिलं आहे. 

काय म्हणाले गायकवाड:

"शहरात होणाऱ्या ट्राफिक जॅम-मधून सहजरित्या निघण्यासाठी ही उत्तम रणनीती आहे. मला कधी कधी अचानक बैठकीला बोलावलं जातं, त्यावेळी यायला भरपूर वेळ होतो, मात्र मी रुग्णवाहिकेतून आलो तर मला वाहतूक कोंडीत अडकावं लागत नाही. मला शासकीय वाहन उपलब्ध नाही." असं अजब विधान गायकवाड यांनी केलंय. रुग्णवाहिका वैयक्तिक कामांसाठी वापरली नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

मात्र रुग्णवाहिका ही रुग्णांसाठी असते आणि अशा पद्धतीनं अधिकारीच त्यातून फिरायला लागले तर रुग्णांचं काय होणार? असा प्रश्न निर्माण होतो. दरम्यान या प्रकाराची योग्य ती  चौकशी करावी लागेल आणि अधिकाऱ्यांना येण्या-जाण्याचा भत्ता दिल जातो, तो भत्ता गायकवाड यांना मिळाला का हेही बघावं लागेल. "या प्रकरणाचा योग्य तो तपास केला जाईल." असं वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचनालय प्रमुख डॉ. टी. पी. लहाने यांनी म्हंटलंय.   

Mumbai hospital Superintendent using Ambulances for their personal work 


      

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com