रिक्षा प्रवासात तीन, तर टॅक्सी प्रवासात चार रुपये वाढ होण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

taxi

इंधन दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सी व्यवसायावर परिणाम झाला असून उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याचे टॅक्सीचालक सांगत आहेत.

रिक्षा प्रवासात तीन, तर टॅक्सी प्रवासात चार रुपये वाढ होण्याची शक्यता

मुंबई - इंधन दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सी व्यवसायावर परिणाम झाला असून उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याचे टॅक्सीचालक सांगत आहेत. त्यामुळे महागाईच्या तुलनेत भाडेवाढीची मागणी आता रिक्षा, टॅक्सी युनियनकडून केली जात असून, गेल्या काही महिन्यांपासून भाडेवाढीची मागणी प्रलंबित आहे. मात्र येत्या आठवडाभरात या प्रलंबित मागणीवर तोडगा निघण्याची शक्यता असून रिक्षा प्रवासात तीन रुपये, तर टॅक्सी प्रवासात चार रुपये वाढ होण्याची माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली.

सातत्याने इंधनाचे दर वाढत असून त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर झाला आहे. महागाई वाढल्याने आता पुन्हा एकदा रिक्षा, टॅक्सी दरवाढीची दाट शक्यता आहे. इंधनावरील उत्पादन शुल्क आणि सेवा कर कपात होऊनही इंधनाचे दर अद्याप वाढलेलेच आहेत. परिणामी आताही पेट्रोल १०६.२५, तर डिझेल ९४.२२ रुपये प्रतिलिटर घ्यावे लागते आहे. शिवाय सीएनजीच्या दरातही वाढ झाली असल्याने मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणात चार लाखांपेक्षा जास्त रिक्षा, तर ५० हजार टॅक्सींची संख्या असताना प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी वाहने रस्त्यावर असल्याचे रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून सांगितले जात आहे.

त्यामुळे खटुवा समितीच्या भाडेवाढीच्या सूत्रानुसार रिक्षाचे भाडे २१ ऐवजी २४ रुपयांपर्यंत वाढू शकते, तर टॅक्सीचे भाडे २५ ऐवजी २९ होण्याची शक्यता आहे. म्हणजे रिक्षाच्या भाड्यात तीन रुपये, तर टॅक्सीच्या भाड्यात चार रुपये वाढण्याची शक्यता आहे.

खटुवा समितीच्या शिफारशीनुसार रिक्षाचे भाडे तीन रुपयांनी वाढणे आवश्यक आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. परिवहन विभागाने येत्या आठवड्याभरात बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

- थॅम्पी कुरियन, सरचिटणीस, मुंबई रिक्षा मेन्स युनियन

Web Title: Mumbai Increase Of 3 Rupees In Rickshaw Travel And 4 Rupees In Taxi Travel

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..