

मुंबई : दिवाळीतील रासायनिक फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील प्रदूषण चिंताजनक स्तरावर पोचले आहे. जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार शुक्रवारी मुंबई जगातील 7 वे प्रदूषित शहर ठरले.
लक्ष्मी पुजनाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 169 नोंदवला गेला. त्यानुसार मुंबई शहर हे जगातील 7 व्या क्रमांकाचे प्रदुषित शहर ठरले आहे.तर पहिल्या क्रमांकावर 426 हवा गुणवत्ता निर्देशांकासह दिल्ली शहर सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. कोलकाता शहराचा देखील प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये समावेश आहे.
गुरुवारी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक हा मध्यम म्हणजचे 162 नोंदविला गेला.तर कुलाबा 290 आणि बीकेसी 290 हवा गुणवत्ता निर्देशांकासह हवेचा स्तर वाईट नोंदविला गेला होता. नवी मुंबई हवा गुणवत्ता निर्देशांक 118,अंधेरी 135,चेंबूर 162,बोरिवली 142 सह मध्यम तर वरळी येथे हाच निर्देशांक 95 सह समाधान कारक नोंदविला गेला.
मुंबईत शनिवार मात्र पुन्हा एकदा प्रदूषणाची पातळी वाढली आहे. 121 हवा गुणवत्ता निर्देशांजसह मुंबईतील हवेचा स्तर वाईट नोंदवला गेला. दक्षिण मुंबईत सर्वाधिक प्रदूषण दिसले असून कुलाबा 328 , माझगाव 309 ,बीकेसी 305 हवा गुणवत्ता निर्देशांकासह हवेचा अतिशय वाईट स्तर नोंदवला गेला. अंधेरी 235 ,चेंबूर 208 हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट तर भांडुप 102,मालाड 132 ,वरळी 145 , बोरीवली 167 , नवी मुंबई 139 येथे मध्यम हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला.
जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांक (5 नोव्हेंबर)
मुख्य शहरं देश एक्यूआय
दिल्ली - इंडिया 426
लाहोर - पाकिस्तान 246
बीजिंग - चायना 212
बुशकेक - कर्गिस्तान 188
कराची - पाकिस्तान 182
शिन्यांग - चायना 171
मुंबई - इंडिया। 169
वाढते प्रदूषण चिंताजनक आहेच मात्र आरोग्यासाठी घातक देखील आहे. शिवाय अशाने आपल्या शहराची प्रतीमा देखील मलिन होते. प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने ठोस पावलं उचलणे गरजेचे आहे.
-भगवान केसभट , संस्थापक , वातावरण फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.