auto rickshaw karaoke
मुंबई
Viral Video: ऑटोवाल्यानं मन जिंकलं! ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या मुंबईकरांचे मनोरंजन करणारा अवलिया; पाहा व्हिडिओ
Mumbai juhu auto rickshaw driver Viral Video: वाहतूक कोंडीत अडकलं की, लोकांची चिडचिड होते. घरी लवकर जायचं असतं, त्यामुळे असं अडकून पडणं कुणाला आवडणार नाही. त्यामुळे मूड खराब होणारच.
मुंबई- शहर म्हटलं की लोकांची गर्दी, वाहतूक कोंडी आली. वाहतूक कोंडी तर अनेक शहरांच्या पाचवीला पुजलेली आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांतील लोकांसाठी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. मुंबईत असे अनेक ठिकाणं आहेत जिथे वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना नाकी नऊ येतं. पण, मुंबईतला एक ऑटोरीक्षा ड्रायव्हर आहे जो वाहतूक कोंडीच्या समस्येला मनोरंजनात बदलू पाहात आहे.
वाहतूक कोंडीत अडकलं की, लोकांची चिडचिड होते. घरी लवकर जायचं असतं, त्यामुळे असं अडकून पडणं कुणाला आवडणार नाही. त्यामुळे मूड खराब होणारच. पण, वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले काहीजण आपला विरंगुळा शोधतातच. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये मुंबईत वाहतूक कोंडीत अडकलेला ऑटोरिक्षावाला स्वत:चं आणि दुसऱ्यांचं मनोरंजन करताना दिसत आहे.

