
मुंबई : शहरातील कबुतरांची संख्या झपाट्याने वाढत असून, या पक्ष्यांमुळे सार्वजनिक आरोग्याला आणि वास्तूंच्या संरक्षणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. भारतीय निसर्ग इतिहास संस्था (बीएनएचएस) आणि कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्राम यांनी २०१७ पासून कबुतरांचा अभ्यास केला असून त्या अभ्यासात मुंबईत ३,५०० कबुतरे एका ठिकाणी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सर्वात जास्त आणि मोठे कबुतरखाने असणाऱ्या शहरांमध्ये मुंबई अग्रस्थानी आहे.