मोबाईलवर बोलताना घात झाला, इमारत कोसळून एकाचा मृत्यू

वाईट नशीब म्हणतात ते याला, मुंबईतील काळबादेवी येथील घटना
मोबाईलवर बोलताना घात झाला, इमारत कोसळून एकाचा मृत्यू
file photo

मुंबई: काळबादेवी (kalbadevi) येथील इमारत कोसळून (building collapse) एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. संध्याकाळच्या सुमारास इमारतीचा भाग कोसळल्याने ही इमारत रिकामी करण्यात आली होती. मात्र,रात्री इमारत पूर्ण कोसळली तेव्हा इमारती खाली मोबाईलवर बोलत (mobile) असलेले ६१ वर्षीय सुंदरा साव हे ढिगाऱ्या खाली अडकले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

काळबादेवी येथील खांडेराववाडीतील पाचव्या क्रमांकाच्या चार मजली इमारतीचा काही भाग रविवारी संध्याकाळी 4.30 वाजल्याच्या सुमारास कोसळला. त्यानंतर ही इमारती अग्निशमन दलाने रिकामी केली. ही म्हाडाची इमारत असून यात प्रामुख्याने सोन्याचे दागिने बनविणारे कारखाने होते. म्हाडाच्या पथकाने इमारतीचे प्रवेशव्दाराही सिल केल होते.

मोबाईलवर बोलताना घात झाला, इमारत कोसळून एकाचा मृत्यू
Drug case: शाहरुखच्या मुलासोबत पकडल्या गेलेल्या मुनमुन धामेचाचे हॉट PHOTOS

मात्र, 10.30 वाजल्याच्या सुमारास संपुर्ण इमारत कोसळली.त्यावेळी इमारतीच्या खाली उभे असलेल्या सुंदरा साव हे ढिगाऱ्याखाली अडकले. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखालून बाहेर काढून जे.जे.रुग्णालयात दाखल केले. मात्र,डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती देण्यात आली.

मोबाईलवर बोलताना घात झाला, इमारत कोसळून एकाचा मृत्यू
राज्य सरकारची बदमाशी चाललीय सगळी, देवेंद्र फडणवीसांची टीका

संध्याकाळी इमारतीचा भाग कोसळल्यानंतर इमारत रिकामी करण्यात आली होती. मात्र,नंतर रात्री संपूर्ण इमारत कोसळली. तेव्हा इमारतीखाली उभी असलेली व्यक्त ढिगाऱ्याखाली अडकली असे स्थानिक नगरसेवक आकाश पुरोहित यांनी सांगितले. साव हे या इमारतीतील कारखान्यातच काम करत होते, असे स्थानिकांकडून सांगण्यात आले. ही म्हाडाची इमारत असल्याचे महानगर पालिकेकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com