

Kalyan Accident CCTV VIDEO
Esakal
कल्याण शहरात एका ४२ वर्षीय उद्योजकाचा कारच्या धडके मृत्यू झालाय. कार चालवणारा १७ वर्षांचा एक मुलगा होता. घटनेनंतर तो फरार झाला होता, दुसऱ्या दिवशी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. कल्याणमधील रिंगरोडवर मंगळवारी सायंकाळी हा अपघात झाला. गांधारी परिसरातील रिंग रोडवर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. मंगळवारी (ता. २५) सायंकाळच्या सुमारास एका भरधाव कारने सायकलस्वाराला दिलेल्या भीषण धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा थरारक अपघात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, यामुळे पुन्हा एकदा रिंग रोडवरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. Kalyan Accident CCTV Video Shows Minor Speeding Car Hits Cyclist