Viral Video : भर दुपारी दुचाकीने अचानक घेतला पेट, घटनेचा व्हिडिओ समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire

Viral Video : भर दुपारी दुचाकीने अचानक घेतला पेट, घटनेचा व्हिडिओ समोर

डोंबिवली : कल्याण शीळ रोडवर भर दुपारी एका चालत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरच या गाडीने पेट घेतल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. घटनेची माहिती मिळतात तातडीने पोलीस तसेच अग्निशमन दलचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत या आगीवर नियंत्रण मिळवले.

(Kalyan Bike Fire Accident Latest Updates)

कल्याण शीळ रोडवर डोंबिवली दिशेने प्रवास करणाऱ्या एका दुचाकीने रविवारी भर दुपारी अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत दुचाकीस्वाराने गाडी उभी करून बाजूला पळ काढला. चालत्या गाडीने पेट घेतल्याने आजूबाजूच्या वाहन चालकांमध्ये गोंधळ उडाला. या आगीत दुचाकी जळून खाक झाली असून सुदैवाने दुचाकी स्वार बचावला आहे. घटनेची माहिती मिळतात तातडीने पोलीस तसेच अग्निशमन चे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत या आगीवर नियंत्रण मिळवले.

हेही वाचा: Shivsena: चंद्रकांत खैरे म्हणजे वाया गेलेली केस - गुलाबराव पाटील

सर्वोदय मॉल परिसरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरच या गाडीने पेट घेतल्याने बाजारात येणारे नागरिक, व्यापारी यांची धावपळ उडाल्याचे पहायला मिळाले. त्वरित याची माहिती स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलास देण्यात आली. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर त्वरित नियंत्रण मिळवले.