मुंबई : कल्याण रेल्वे स्थानकातून अडीच वर्षीय मुलाचे अपहरण

सहा तासांच्या आत आरोपी अटक
Crime Latest News
Crime Latest News

डोंबिवली - कल्याण रेल्वे स्थानकातून एका अडीच वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना कल्याण जीआरपी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहय्याने सहा तासांच्या आत बेडय़ा ठोकल्या आहेत. पूजा मुंडे आणि अमित शिंदे अशी या आरोपींची नावे असून हे दोघे मुले चोरणाऱ्या रॅकेटशी संबंधित आहेत का? या अंगाने पोलिस तपास करीत आहेत.

कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर एक फिरस्ता महिला संजू राजवंशी ही तिच्या अडीच वर्षाच्या मुलाला सोडून वडापाव घेण्यासाठी कॅन्टीनच्या दिशेने गेली. ती पुन्हा परत आली तेव्हा त्याठिकाणी तिचा अडीच वर्षाचा मुलगा अक्षय त्याठिकाणी नव्हता. हे पाहून तिला धक्काच बसला. तिने मुलाची शोधाशोध सुरु केली. अखेर मुलगा न सापडल्याने तिने कल्याण जीआरपी गाठले.

कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अविनाश आंधळे, पोलिस निरिक्षक अर्चना दुसाणो आणि पोलिस अधिकारी प्रमोद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाचा शोध सुरु झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही पाहिला तेव्हा पोलिस हैराण झाले. या मुलाला एक महिला आणि एक पुरुष घेऊन गेले असल्याचे दिसून आले. पोलिस अधिकारी प्रमोद देशमुख यांनी तपासाचे चक्र फिरविले. सहा तासाच्या आत मुलगा अक्षय याची सुटका करीत. दोन्ही अपहरणकर्ते अमित शिंदे आणि पूजा मुंडे या दोघांना उल्हासनगरातून ताब्यात घेतले. हे दोघे सध्या किरकोळ काम करतात. असे ते सांगत आहेत. मात्र ते मुले चोरीचे काम करतात का हे दोघे कोणत्या रॅकेटशी संबंधित आहेत का या अंगाने तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अविनाश आंधळे यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com