Mumbai : मासळीविक्रीचे नवे केंद्र करंजा; ससून डॉकला पर्याय, खवय्यांसाठी पर्वणी

मंजूर झालेला दीडशे कोटींचा निधी वेळेत मिळाला नसल्याने कित्येक वर्षांपासून बंदराचे काम रखडले होते.
Mumbai Karanja new fish market alternative Sassoon Doc Parvani gourmets
Mumbai Karanja new fish market alternative Sassoon Doc Parvani gourmetsSakal

उरण - मुंबईच्या ससून डॉकवरील मच्छीमार बोटींच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. अपुऱ्या पडणाऱ्या जागेमुळे मच्छीमारांचे नुकसान होत असल्याने उरण येथील करंजा परिसरात नवीन बंदर उभारले गेले आहे. मात्र, या बंदरासाठी

मंजूर झालेला दीडशे कोटींचा निधी वेळेत मिळाला नसल्याने कित्येक वर्षांपासून बंदराचे काम रखडले होते. अखरे या बंदरातून माशांची खरेदी-विक्री सुरू झाली असून नवी मुंबई, पनवेल, तसेच उरणमधील मासळीच्या खवय्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

Mumbai Karanja new fish market alternative Sassoon Doc Parvani gourmets
Mumbai News : मिठी नदीत सापडला मृतदेह; पोलीसांकडून तपास सुरू

रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांना माशांची विक्री करण्याकरिता ससून डॉक हा एकमेव पर्याय होता. या बंदरात मासळीची खरेदी-विक्री, स्वच्छता, साठवणूक केली जात असल्याने ससून डॉकवर मच्छीमारांच्या बोटींची गर्दी होऊ लागली होती.

रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना जवळच मासळीची खरेदी-विक्री करता यावी, म्हणून २०११ ला करंजा येथे नवीन बंदर उभारण्यास सुरुवात झाली.

अडथळ्यांची शर्यत पार

अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर १ ऑगस्टपासून करंजा बंदर सुरू करण्यात आले आहे. या बंदरामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रातून पकडलेल्या मासळीचा बाजार संध्याकाळी चार वाजल्यापासून सुरू होत आहे.

त्यामुळे मच्छीमार, मासळी विक्रेत्या महिला, मासळी मार्केटवाले यांच्यासह सर्व व्यापारी, खवय्यांसाठी करंजा बंदर आता नवीन केंद्र झाले आहे.

Mumbai Karanja new fish market alternative Sassoon Doc Parvani gourmets
Mumbai Ambedkar Smarak: मुंबईत आंबेडकरांचा 350 फूट उंचीचा पुतळा उभारणार; सरकारचा हिरवा कंदील

बंदरासाठीचा खर्च ३५० कोटींवर

करंजा बंदराचे काम २०११ पासून सुरू करण्यात आले. अजूनही बंदराचे बरेचसे काम बाकी आहे. त्यामुळे बंदरासाठीचा खर्च १५० कोटींवरून ३५० कोटींवर गेला आहे. अशातच सध्या करंजा बंदरात ६५ ते ७० बोटी मासळी विक्रीसाठी येत असून दीडशेपेक्षा अधिक मासळी विक्रेते बंदरात येत आहेत.

सद्यस्थितीत करंजा बंदर छोटेखानी सुरू झाले आहे. दररोज मासळीची खरेदी-विक्री होत आहे. शासनाच्या हलगर्जीपणामुळे करंजा बंदराचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे दीडशे कोटींचे काम आता ३५० कोटींवर गेले आहे.

- मार्तंड नाखवा, मच्छीमार नेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com