कसारा-सीएसएमटी लोकलला आग! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Local Fire

मध्य रेल्वेचा कसारा-सीएसएमटी लोकलमध्ये गुरुवारी सकाळी ब्रेकवायंडिंगची घटना घडली आहे.

Local Fire : कसारा-सीएसएमटी लोकलला आग!

मुंबई - मध्य रेल्वेचा कसारा-सीएसएमटी लोकलमध्ये गुरुवारी सकाळी ब्रेकवायंडिंगची घटना घडली आहे. या घटनेमुळे लोकलचा चाकाला किरकोळ आग लागली होती. त्यामुळे काही काळ लोकल वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी प्रवाशांना सकाळी कार्यलयात पोहचण्यासाठी लेटमार्क लागला आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी घडली होती. कसारा-सीएसएमटी लोकल कसाऱ्याहून मुंबईसाठी रवाना झाली. तेव्हा कसारा स्थानक ओलांडताच प्रवाशांनी चाकातून आगीच्या ज्वाला आणि धूर येत असल्याचे जाणवले. डब्यातील प्रवाशांनी आपत्कालीन साखळी खेचून गाडी थांबवली. त्यानंतर काही कालावधीसाठी प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रवाशांनी गाडी बाहेर उड्या घेतल्या. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वे अधिकारी - कर्मचारी दाखल झाले.

काही प्रवाशांच्या मदतीने चाकाला लागलेल्या छोट्या स्वरूपातील आगीवर पाणी टाकून आटोक्यात आणली.या घटनेमुळे २० मिनिटे गाडी खोळंबळी होती. त्यानंतर गाडी रवाना करण्यात आलेली आहे. मात्र, या घटनेमुळे सीएसएमटीकडे डाऊन मार्गावरील लोकल सेवा एकामागेएक खोळंबल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहे.चाकाला प्लॅस्टिक चिटकून ब्रेकच्या अति घर्षणामुळे या प्लॅस्टिकने पेट घेतला असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहेत.

टॅग्स :fireMumbaiLocal Train