Mumbai किरिट सोमय्यांनी घेतली त्या मुलाच्या कुटूंबाची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

Mumbai : किरिट सोमय्यांनी घेतली त्या मुलाच्या कुटूंबाची भेट

डोंबिवली : डोंबिवलीतील 27 वर्षीय तरुणाचा मुलूंड येथे गरबा खेळताना मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. ऋषभ लहरी मंगे असे मृत तरुणाचे असून या तरुणाच्या कुटूंबाची सोमवारी भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी भेट घेत सात्वन केले. याविषयी सोमय्या म्हणाले, अशा प्रकारे तरुणाचा मृत्यु होणे, ही घडलेली घटना ही दुर्दैवी आहे.

मुलाचा देखील यात काही दोष नाही, आपलंच दुर्दैव आहे. मेडीकल काही इश्यु असतील ते आता पीएम रिपोर्ट मध्ये पुढे येतील. गरबा खेळताना त्याला विकनेस आला आणि उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. मी एक गोष्ट निश्चित सांगू इच्छितो की कोणताही उत्सव असो राज्यात एकही चुकीचा असा प्रसंग किंवा घटना घडलेली नाही. कारण समाजामध्ये एक शिस्तता आली आहे, पोलीसांची व्यवस्थाही सुधारली आहे. मेडीकलमुळे अशा काही दुर्घटना घडतात त्याची खंत वाटते असे ते यावेळी म्हणाले.