
Kurla Crime: मुंबई आणि उपनगरांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच कुर्ला भागात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. ४१ वर्षीय मुलीने आपल्या वयोवृद्ध आईला संपवलं आहे. त्याचं कारणदेखील संतापजनक आहे. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी मुलीला पोलिसांनी अटक केलीय.