Mumbai : कुर्ल्यात भीषण आग; 8-10 बंबांच्या मदतीनंतरही आग विझेना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire brigade
Mumbai : कुर्ल्यात भीषण आग; 8-10 बंबांच्या मदतीनंतरही आग विझेना!

Mumbai : कुर्ल्यात भीषण आग; 8-10 बंबांच्या मदतीनंतरही आग विझेना!

मुंबईतल्या कुर्ला इथं गुलाम शाह इस्टेटमध्ये भीषण आग लागली आहे. या भागात काही गोदामं आहेत, या गोदामांना आग लागलेली आहे. मात्र अद्याप आगीचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कुर्ल्यामध्ये एलबीएस मार्गावरील गुलाब शहा इस्टेटमधल्या गोदामांना भीषण आग लागली आहे. गेल्या दोन तासांपासून अग्निशमन दलाचे दहा ते पंधरा बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ही आग आणखी भडकताना दिसत आहे.

या गोदामांमध्ये कपडे, कंप्युटरचे विविध सुटे भाग, प्लास्टिकचं साहित्य अशा गोष्टी असल्याने ही आग भडकत आहे.

टॅग्स :Mumbai